मंगल कार्यालय / सभागृहांसंबधित विविध सुविधा
कार्यालयीन वेळ :
- सका. १०.०० ते रात्री ७.३० पर्यंत
- रविवारी सका. १०.०० ते १२.०० वा. पर्यंत.
- साप्ताहिक सुट्टी गुरुवार
सभागृहाची पूर्ण वेळ व सत्रवार नोंदणी एक वर्ष अगोदर करता येईल.चार किंवा कमी तासांसाठी दोन महीने अगोदर करता येईल. लग्न किंवा मुंजीसाठी कमीत कमी एक सत्राची नोंदणी आवश्यक.
सभागृह क्र. १ (लग्न व इतर कार्यक्रम), सभागृह क्र. २ (जेवणासाठी फ़क्त) | ||
सभागृह वापराचा कालावधी | भाड़े | अनामत |
पूर्ण दिवस ७.३० ते रा १० | ५०,००० | १०,००० |
अर्धा दिवस स. ७.३० ते दु ३ अर्धा दिवस दु ४ ते रा १० | ३५,००० | १०,००० |
सभागृह क्र. ३ (सभांगण) स ९ ते रा १० | ६,००० | ३,००० |
सभागृह क्र. ३ (एक सत्र) | ३,००० | ३,००० |
सभागृह क्र. ४ पूर्ण दिवस ७.३० ते रा १० | २०,००० | ७,००० |
अर्धा दिवस स. ८ ते दु ३ व दु ४ ते रा १० (खुर्च्यासह १२५ माणसांसाठी) | १२,००० | ७,००० |
सभागृहासाठी नोंदणी करतेवेळी भाड़े व अनामत रक्कम अशी एकूण सर्व रक्कम धनादेशाद्वारे / रोखीने भरावी लागेल.पूर्ण वेळ नोंदणीसाठी सभागृह सकाळी ७.३० पासून रात्रों १० पर्यंत वापरण्यासाठी मिळेल. सभागृह ज्यादा वापरल्यास प्रत्येक तासाला रु ३,५००/- ज्यादा आकार भरावा लागेल. सत्रवार नोंदणीसाठी सदर ज्यादा तासांची सुविधा पुढील नोंदणीवर अवलंबून असेल.सभागृहाच्या भाडयात स्टेजसह रिकामा हॉल, वधुपक्षासाठी व वरपक्षासाठी प्रत्येकी एक खोली, स्वयंपाकगृह, पाणी, वीज, लिफ्ट व जनरेटर या सुविधा मिळतील. जनरेटरची सुविधा रात्री १० नंतर मिळणार नाही.
रात्री वधू वर खोल्यांसाठी भाड़े प्रत्येकी रु. ४,०००/-.सलग दोन दिवस बुकिंग असल्यास, आणि त्यासाठी रात्री हॉल हवा असल्यास हॉलचे भाड़े १७,५००/- राहिल. त्यात १ एसी मिळेल.खुर्च्या, टेबल, डेकोरेशन, याचा वेगळा आकार असून या सर्व गोष्टींची तसेच भोजन व्यवस्था म.से. संघाचे अधिकृत कंत्राटदार में. सतीश कामत यांचेकडूनच कार्याच्या १० दिवस आधी ऑर्डर देऊन करावी लागेल.व्हिडीयो कॅमेरा विजेवर चालणारा असल्यास प्रत्येक हेलोजन मागे रु.५००/- जादा आकार घेतला जाईल. तो अनामत मधून कापला जाईल.वेळोवेळी अमलात असणारे सर्व सरकारी व संस्थेचे नियम सभागृह वापरणाऱ्या सर्व ग्राहकांवर बंधनकारक राहतील.
सभागृहामध्ये सनई चौघडा व्यतिरिक्त अन्य वाद्यवादन, बैंड, मद्यपान, मांसाहार याला सक्त मनाई आहे.अनामत रक्कम परत करतेवेळी १४.१/४ टकके (सेवा कर) सर्विस टक्स व इतर देय रकमा कापल्या जातील.में. सतीश कामत यांची कार्यालयीन वेळ, स. १० ते १२ व सायं ५ ते ८ दूरध्वनी क्र. २५९१२०७३.वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर व लिफ्ट कुठल्याही कारणाने बंद पडल्यास होणा-या गैरसोयीस संस्था जबाबदार नाही.जनरेटरवर आवश्यक प्रकाश योजना आणि फक्त २५ टक्के वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध होईल व लिफ्ट बंद असेल.हॉल रद्द केल्यास फक्त अनामत रक्कम परत मिळेल, सदर तारखेला दुसऱ्या ग्राहकाकडून आरक्षित झाल्यास भाड्याच्या रकमेच्या ७५ टक्के अधिक अनामत रक्कम परत मिळेल.