मैत्रेयी

नवीन वास्तूमध्ये संस्थेचे कार्य जोमात सुरु झाले आणि महाराष्ट्र सेवा संघाचा महिला विभाग असावा असे सर्वांना वाटू लागले आणि 18 ऑक्टोबर 1986 रोजी मोठय़ा दिमाखात सुप्रसिध्द लेखिका पद्मजा फाटक यांच्या उपस्थितीत महिला विभाग म्हणजे मैत्रेयी ची स्थापना झाली आणि महिलांना हक्काचे असे व्यासपीठ मिळाले. अनेक मान्यवर लेखिका, विचारवंत, पत्रकार, सिने-नाटय़सृष्टीतील कलाकार, गायिका, नृत्यांगना, उद्योजिका अशा विविध क्षेत्रातील महिलांनी मैत्रेयीचे व्यासपीठ समृद्ध केले आहे. सुरुवातीला स्नेहसंमेलन, महिलादिन, कोजागिरी अशा कार्यक्रमांपुरतंच मर्यादित असलेलं मैत्रेयीचं व्यासपीठ जानेवारी 2001 पासून विस्तारलं, एका नव्या उपक्रमाद्वारे- म्हणजेच अक्षरमैत्रीद्वारे ! महिन्यातून एकदा; पहिल्या मंगळवारी सातत्याने मैत्रेयीच्या मैत्रिणी भेटत आहेत. पुस्तक परीक्षणापासून सुरुवात झाली आणि त्यानंतर विविध विषयांवर व्याख्याने, कवितांचे कार्यक्रम, कथाकथन, अनुभवकथन, कीर्तन याद्वारे नवोदित लेखिकांना, कलाकारांना व्यासपीठ मिळालं. त्यातूनच कार्यक्रमाला येणाऱ्या मैत्रिणींनी श्रोत्यांच्या भूमिकेतून वक्त्यांच्या भूमिकेत कधी प्रवेश केला हे कळलं देखील नाही. मैत्रेयीच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ म्हणजे व्यासपीठावर सर्व कार्यक्रमात असणारा महिलांचाच सहभाग. कार्यक्रमांची थोडक्यात झलक पुढीलप्रमाणे –

  • महिलादिनाचे कार्यक्रम – झाडंवाल्याबाई–संध्या चौगुले, पत्रकार आरती कदम, भटक्या विमुक्तांसाठी काम करणाऱ्या पल्लवी रेणके, उद्योजक सुलोचना भाकरे, आय.एफ.एस. अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोलिसांसाठी गुन्हेगारांची रेखाचित्रे काढणाऱ्या दीप्ती कांबळे, महिला पोलीस अधिकारी गीतांजली जगताप.
  • वासंतिक मेळावा – मधुरा जसराज, स्मिता गवाणकर यांच्या मुलाखती, जयश्री काळे (विंदादर्शन), उत्तरा चौसाळकर (बाऊलगान), ऋतुराज वसंत हा दृकश्राव्य कार्यक्रम, सेल्फी हे लोकप्रिय नाटक, पु. शि. रेगे यांच्या कादंबरीवर आधारित, प्रिया जामकर अभिनित, एकपात्री नाटक सावित्री.
  • अक्षरमैत्री – डॉ.वसुधा आपटे (न्यायवैद्यकशास्त्र), डॉ.सुचिता सावंत (सणांमागील विज्ञान), सुशीला ओक (यमगरवाडी येथील सामाजिक कार्य), शोभा जोशी (नर्मदा परिक्रमा), भक्ती मायाळू (संकलन), प्रा. रेखा दिवेकर (चिरतारुण्याचा आरसा), डॉ. केतकी गद्रे (नातेसंबंध – ग्रह आणि आग्रह), दीपाली केळकर (हास्यसंजिवनी), लेखिका आपल्या भेटीला या उपक्रमातून सुनीता केळकर (बिनधास्त बुढ्ढय़ा), वर्षा मुळे (धाकटय़ा राणीसाहेब), विनिता चितळे (ओ.पी.डी.नं 17) अक्षरमैत्रीच्या 250 व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उर्मिला पवार यांच्या आत्मकथनावर आधारित आयदान हे नाटक आयोजित केले होते.
  • मैत्रेयीचा वर्धापनदिन – ब्रेक के बाद ( करीयरमध्ये ब्रेक घेऊन नंतर यशाचे शिखर गाठणाऱ्या महिलांच्या मुलाखती), तिचं आकाश (सुरेखा यादव-पहिली मोटरवुमन, गिर्यारोहक-अपर्णा भट्टे यांच्या मुलाखती), डॉ. शुभा थत्ते, प्रतिमा नाईक, डॉ. अनुराधा सोवनी (परिसंवाद- मन वढाय वढाय), नाटय़संगीत- वर्षा भावे व त्यांच्या शिष्या, ज्योती चांदेकर, रोहिणी हट्टंगडी, शुभांगी- सखी गोखले, उत्तरा केळकर, मेघना एरंडे यांच्या मुलाखती, कथ्थक नृत्यांगना रंजना फडके यांचा प्रेमरंग हा कार्यक्रम, हेलन केलर यांच्या जीवनावरील किमयागार हे नाटक
  • डॉ.सिंधुताई डांगे पुरस्कृत कै. सौ. प्रभावती पागे पुरस्कार – मुलुंडमधील 35 वर्षांवरील आपापल्या क्षेत्रात असाधारण कामगिरी केलेल्या महिलेला पुरस्कार. गेल्या पाच वर्षातील पुरस्कारप्राप्त- सुषमा केतकर (लेखिका), शारदा गणेशन(नृत्यांगना), मृण्मयी रानडे(पत्रकार), स्वाती बोवलेकर(अभिनेत्री), चंद्रकला कदम (चित्रकार)
  • साहित्य सौरभ – मैत्रेयीच्या 30 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लेखिकांचा मेळावा आयोजित केला होता. विविध परिसंवादात मंगला गोडबोले, छाया महाजन, उषा तांबे, सविता दामले, अरुणा दुभाषी, अनुपमा उजगरे यांनी आपले विचार मांडले. नीरजा, स्वाती चांदोरकर, मुग्धा गोडबोले यांनी लेखनाचा वारसा याविषयी सांगितले.

श्री प्रियंका मोकाशी (अध्यक्ष)

श्री नंदिनी हंबर्डे (कार्यवाह)