कला

महाराष्ट्र सेवा संघात सामाजिक व सांस्कृतिक कार्य १९७७ साली कलाविभागाची निर्मिती – स्थापना

नाट्य विभाग राज्य नाट्य स्पर्धेत गद्य व संगीत नाटके सादर करून नवीन कलाकारांना संधी.
संगीत शास्त्रीय संगीत, सुगम व नाट्यसंगीत कार्यक्रम, संगीत स्पर्धांचे आयोजन, दिवाळी पहाट, कोजागिरी, नवीन कलाकारांना संधी, रेडिओवरील थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम
चित्रकला हस्तकला – विविध प्रदर्शने
विज्ञान व्याख्याने, खगोलशास्त्र शिबिरे, कॉम्पुटर, टेस्ट टयूब बेबी माहिती.
आरोग्य आय कॅम्प, डायबेटिक, रक्तदाब विनामूल्य वैद्यकीय सेवा, कर्जत येथे तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा तसेच शिबिरे, आयुर्वेद व्याखाने
पितृ स्मृती व्याखानमाला कर्तृत्व गाजविलेल्या व्यक्तींचे स्मरण, विविध विषयावरील प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींच्या कार्याचे स्मरण.
साहित्य केंद्र अंतर्गत नवनवीन प्रयोग, महानगर साहित्य संमेलन,
काव्य कवी संमेलने, स्पर्धा, काव्य मैफिली
गिरीमित्र उपक्रम संमेलने गिरीभ्रमण, गिर्यारोहण या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची संमेलने. गिर्यारोहणात विशेष कामगिरी करणाऱ्याचा गौरव, वेगवेगळ्या ध्वनिचीत्रफितींचे प्रदर्शन
एक कलाकार एक संध्याकाळ आपल्या उमेदीच्या काळात अंगभूत साहित्यिक, अभिनय, कला इ. च्या माध्यमातून गाजविलेले व केवळ वय झाल्यामुळे प्रवासापासून वेगळे पडलेले किंवा कदाचित विस्मृतीत जात असलेल्या कलावंत साहित्यिकांना रसिकापुढे सादर करून त्यांचा पत्रकाद्वारे यथोचित गौरव.
व्याख्याने प्रबोधनपर ज्ञानात भर घालणारी विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची, साहित्यिकांची व्याख्याने
प्रासंगिक कलेचे वेगवेगळे आविष्कार सादर करणाऱ्या कलावंताना नेहमीच व्यासपीठ उपलब्ध.

सुरुवातीपासून आरोग्य,कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, संगीत आशा सर्वांगीण विषयांना स्पर्श करणे. कार्यक्रम कला विभागातर्फेच सादर केले जात असत. परंतु जसा काळ पुढे सरकत गेला तस तसे वेगवेगळे स्वतंत्र विभाग अस्तित्वात आले व त्यानुसार कार्यक्रमांची विभागणी झाली.

पितृस्मृती व्याख्यानमाला पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण श्राद्ध वगैरे धार्मिक विधी करतो. महाराष्ट्र सेवा संघाच्या कलाविभागाने संपूर्ण साम्राज्य आपले कुटुंब मानून समाजातील थोर पुरुषांच्या स्मृती जागविण्यासाठी १९९१ साली ही व्याख्यानमाला सुरु केली. पितृपंधरवड्यात तीन दिवस या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. आतापर्यंत विद्याधर गोखले यशवंत पाठक, बाबासाहेब पुरंदरे, अरविंद इमानदार, वाय जी पवार, अशोक रानडे, अरुण टिकेकर, डॉ जयसिंगराव पवार, द. वा. गोखले, कै गोविंद पानसरे, डॉ सदानंद मोरे आदि मान्यवरांनी व्याख्यानमालेसाठी आपले योगदान दिले आहे. संस्थेचे माजी विश्वस्त श्री. भा. ल. महाबळ यांनी आपले पिता कै. लक्ष्मणराव महाबळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भरघोस देणगी या व्याख्यानमालेसाठी दिली.

श्री. भा. ल. महाबळ यांनी दिलेल्या देणगीतून त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगाबाई लक्ष्मण महाबळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ कला विभागातर्फे संत रचना यावर आधारित दोन कार्यक्रम आयोजित केले जातात.

श्री रवींद्र लाड (अध्यक्ष)

श्री विनोद सौदागर (कार्यवाह)