अर्थ

अर्थ विभागाची सुरुवात सन २००९ मध्ये झाली.

विभागाचा पहिला कार्यक्रम सन २०१० च्या सुरुवातीला ‘जोखीम व्यवस्थापन’ (रिस्क मॅनेजमेंट) या विषयावर झाला.

सन २०१० ते आतापर्यंतच्या काळात आर्थिक विभागाचे काम खूपच वाढले व विभागातर्फे गुंतवणूक, विमा, बिल्डिंग रीडेव्हलपमेंट, फायनान्स, फायनान्स फेअर या विषयीचे कार्यक्रम व सेमिनार याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यम प्रायोजकत्वाने सन २०१४ पासून अर्थप्रबोधन व्याख्यानमाला सुरु करण्यात आली. आतापर्यंत या व्याख्यानमालिकेत ५० कार्यक्रम सादर झाले आहेत.

अर्थविभागाने सादर केलेल्या कार्यक्रमात श्री. अच्युत गोडबोले, श्री. दीपक घैसास महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष व कर सल्लागार श्री. चंद्रशेखर वझे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश महाले, डॉ. अभिजित फडणीस ह्या व अशा विविध तज्ज्ञांची विविध विषयावर व्याखाने झाली. तसेच intellectual property rights विषयी डॉ. मृदुला बेळे व व्यवस्थापन व ग्राहकांचे हक्क या विषयावर श्री.विवेक पत्की यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’ या विषयी डॉ. अभिजित फडणीस यांनी श्रोत्यांना उत्तम माहिती दिली.

अर्थविभागातर्फे सन २०१३ पासून उद्योजक सन्मान पुरस्कार प्रदान करण्यास प्रारंभ झाला. या सोहळ्यात तीन उद्योजकांना प्रतिवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. विभागातर्फे होणाऱ्या उत्तम कार्यक्रमांविषयी श्रोते खूप प्रशंसा करीत असतात व काही श्रोते तर विभागात काम करण्याची इच्छाही प्रदर्शित करीत आहेत. तसेच विभागाच्या कार्यक्रमांचा दर्जा पाहून मुलुंडमधील नागरिकांनी विभागास आर्थिक देणग्याही दिल्या आहेत. यापुढील काळातही श्रोत्यांना उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करण्याचा मानस आहे.

श्री चंद्रशेखर वझे (अध्यक्ष)

श्री विजय वझे (कार्यवाह)