चालू अहवाल वर्षातील कार्यक्रम

Pathological Tests (31-01-2018)

1) Role of lab medicine in Diabetes Management - Dr. Shilpa Deshpande. 2) Cancer Screening - Early detection is the key - Dr. Gauri Vidolkar. 3) Lipids & hearts diseases - Myths & reality - Dr. Shilpa Deshpande.
आजाराचे पक्के निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत केल्या जाणा-या चाचण्या | तपासण्या (Pathological Tests)

मधुमेह, हृदयरोग व कर्करोग या अत्यंत महत्वाच्या आजारांच्या संबंधाने प्रयोगशाळेत केल्या जाणा-या चाचण्या - याबाबतचे समज - गैरसमज व सत्य उघड करून दाखविणारे व्याख्यान

Sahityik Puraskar (14-01-2018)

This year's Sahityik Puraskar will be awarded to Shri. Mukund Taksale. Chief Guest of the evening will be Shri Satish Alekar. Shri Mukund Taksale will be interviewed by Ms. Amruta More

This year's Sahityik Puraskar will be awarded to Shri. Mukund Taksale. Chief Guest of the evening will be Shri Satish Alekar. Shri Mukund Taksale will be interviewed by Ms. Amruta More.

Viveke Dhanasampada (06-01-2018)

Lecture and discussion on Share Market, Mutual Funds Management by Mr. Abhijit Phadnis, Mr. Milind Naik, Mr. Sanjeev Gokhale, Mr. Nikhil Naik, Copmere Mr. Bhushan Thakur. Time: Evening 6 to 8:30 Venue: 1st Floor, S. L. Gadre Hall Maharashtra Seva Sangh, Mulund Mumbai 400 080. Open to all

Lecture and discussion on Share Market, Mutual Funds Management by Mr. Abhijit Phadnis, Mr. Milind Naik, Mr. Sanjeev Gokhale, Mr. Nikhil Naik, Copmere Mr. Bhushan Thakur. Time: Evening 6 to 8:30 Venue: 1st Floor, S. L. Gadre Hall Maharashtra Seva Sangh, Mulund Mumbai 400 080. Open to all

Aeromodelling Show & Indian Air Force Exhibition (12-11-2017)

Main Attraction Aero Modelling show at Sambhaji Maidan, Veer Savarkar Road, Mulund (East) and also showcasing the Might of Indian Air Force with RADAR's, Simulators, G-suits, Armaments, Panels of Fighters, Transport Planes on display.

T and C Registration for IAF.pdf
IAF Student Batch Registration.pdf

Vayushakti - Indian Air Force (11-11-2017)

Showcasing the Might of Indian Air Force with RADAR's, Simulators, G-suits, Armaments, Panels of Fighters, Transport Planes on display.

T and C Registration for IAF.pdf
IAF Student Batch Registration.pdf

Guardians of the skies - Indian Air Force (10-11-2017)

Showcase the Might of Indian Air Force with Raders, Simulators, G-suits, Armaments, Panels of Fighters, Transport Planes on display.

Showcase the Might of Indian Air Force with Raders, Simulators, G-suits, Armaments, Panels of Fighters, Transport Planes on display.

T and C Registration for IAF.pdf
IAF Student Batch Registration.pdf

Samajik Sanstha Puraskar (24-09-2017)

Samajik Sanstha Puraskar Amey Palak Sanghtana Programme

Man Ek Nishabda Saad (17-09-2017)

Manatil Bhavnancha kathhak Nrutyachya Madhyamatun kavyamay Pravas.....

Sankalpana : Mrs. Nilima  Hirave

Kavya : Dr. Rahul Deshpande

Asst. By : Nilima Hirave

Sayali Hogade

Amisha Karambelkar

Ashok Aakhade

Concept By : Medha Divekar

Manisha Joshi

MEDHA DIVEKAR PROG.pdf

Bhulaye Na Bane (16-09-2017)

Program on Music Director C. Ramchandra, A Musical Journey, Presented by Dr. Suresh Chandvankar

C Ramchandra.jpg

Sudharak Audhavarav Athale Samajodharak Puraskar (21-08-2021)

'शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धैर्याच्या गोष्टी ऐकत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगत मी लहानाची मोठी झाले.' - सीमेवरील सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये दुवा बनण्याचे महत्वाचे कार्य करणाऱ्या आणि शहीद जवानांच्या कुटुंबाचा भक्कम आधार होणाऱ्या सुमेधाताई चिथडे सांगत होत्या. मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने आयोजित केलेल्या सुधाकर उद्धवराव आठले समाजोद्धार पुरस्कार वितरण सोहोळ्यात सुमेधाताईनी त्यांच्या कार्याबद्दल सांगितले. त्यांचे पती श्री. योगेश चिथडे हे इंडियन एअरफोर्स मधील निवृत्त अधिकारी आहेत तर त्यांचा मुलगा इंडियन आर्मीमध्ये अधिकारी आहे. महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड यांनी या वर्षीचा सुधाकर उद्धवराव आठले समाजोद्धार पुरस्कार चिथडे दाम्पत्याला प्रदान केला. पुरस्काराचे स्वरूप रोख रु. ५१,०००/- व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्कार सोहोळ्याला मा. खासदार श्री. विनय सहस्र्बुद्धे हेही उपस्थित होते.

१९९९ च्या कारगिल युद्धाने भारावून गेलेल्या सुमेधाताई आणि त्यांच्या पतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेटायला सुरुवात केली. नुसत्या एक, दोन भेटी नव्हेत तर जोपर्यंत मनाची नाळ जोडली जात नाही तोपर्यंत ते त्यांना भेटत राहिले. या कार्याच्या प्रेरणेतूनच “Soldiers Independent Rehabilitation Foundation” (SIRF) ची स्थापना झाली. 'शहीदांचे कुटुंबीय आपले दुःख कधीच कुणासमोर मांडत नाहीत.' शहीद जवानाच्या पत्नीसाठी मी काय करू शकते हा विचार करून त्यांनी अनेक वीरपत्नींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे.

‘अशा कुटुंबांना आर्थिक मदतीपेक्षासुद्धा भावनिक आधाराची जास्त गरज असते. म्हणूनच मी सुरुवात, त्यांना आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानण्यापासून करते. आमच्या घरातील सगळे सणवार हे शहीद सैनिकांच्या कुटुंबियांबरोबर साजरे केले जातात’ सुमेधाताईंनी सांगितले. वर्दीशी समाजाने मनाने जोडले जाणे महत्वाचे आहे. फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशप्रेम उफाळून न येता रोजचाच दिवस सैनिकांच्या आठवणीत गेला पाहिजे असे त्या सांगतात.

२०१५ मध्ये सुमेधाताई ३ परमवीर चक्र विजेत्यांना भेटल्या. Hon Captain बाणा सिंग यांच्याशी बोलताना त्यांनी बाणा सिंग ह्यांना विचारले की त्या सैनिकांसाठी काय करू शकतात. तेव्हा त्यांना बाणा सिंग म्हणाले की सियाचेन ग्लेशिअरवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या सैनिकांच्या श्वासासाठी काहीतरी करा. तेथे काम करणाऱ्या सैनिकांच्या ह्रदयद्रावक कथा ऐकून सुमेधाताईंचे मन हेलावून गेले. त्या जवानांसाठी मी नक्की काहीतरी करीन असा त्यांनी मनाशी पण केला. पुढची तीन वर्षे त्या प्रांताचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि तिथल्या जवानांसाठी oxygen generation plant उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

हा मेरू पर्वत उचलण्याचा नुसता निश्चय करून त्या थांबल्या नाहीत तर भगीरथ प्रयत्न करून त्यांनी आपले कार्य पूर्णत्वास नेले. ४ ऑक्टोबर २०१९ या दिवशी त्यांनी सियाचेन ग्लॅशिअर येथे काम करणाऱ्या सैनिकांसाठी अद्ययावत असा oxygen generation plant इंडियन आर्मीच्या सुपूर्द केला. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ह्या उक्तीला त्यांनी सत्यात उतरविले. चिथडे दाम्पत्याच्या ह्या कार्याची दखल मा. पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा घेतली व त्यांचा सन्मान केला.

आता असेच अजून दोन प्लांट्स सियाचेनच्या सैनिकांसाठी उभारायचे असे चिथडे दाम्पत्याने ठरवले आहे. समाज एकत्र आला तर एकीच्या बळाने हे काम सैनिकांसाठी आपण नक्की करू शकू असा त्यांना विश्वास आहे. या त्यांच्या शिवधनुष्य पेलण्याच्या उपक्रमात आपण सर्वच सहभागी होऊया. त्यांच्या ह्या महान कार्याला महाराष्ट्र सेवा संघाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम!