- दि. १४.१०.१९३७ ह्या दिवशी विजया दशमीच्या सुमुहूर्तावर संस्थेची स्थापना, “दक्षिणी सेवा संघ” ह्या नावाने कार्याला सुरुवात.
- २०.११.१९३७ रोजी “महाराष्ट्र सेवा संघ” असा नामबदल.
- सुरुवातीची वर्गणी – फक्त चार आणे प्रतिमास.
- सुरुवातीची उद्दिष्ट्ये – धार्मिक उत्सव करणे, लोकांच्या अडचणी दूर करणे, प्रत्येकास मदत करणे व सर्वांनी एक होणे.
- गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी साजरी करायला सुरुवात. व्यायामशाळा सुरु. श्रमदानाने नानेपाड्याचा रस्ता बांधला. गावात मानाचे स्थान मिळाले.
- ऑगस्ट १९४० मध्ये कै. गणेश गावडे ह्यांच्या प्रयत्नाने २४०० चौ. वारांची जागा संस्थेला प्राप्त.
- दि. १६ जाने. १९५५ ह्या दिवशी तत्कालीन महसूल मंत्री ना. भाऊसाहेब हिरे ह्यांच्या हस्ते वास्तूचे कोनशिला पूजन. ह्या निमित्ताने “मराठी भाषिक संमेलन आयोजित”.
- ठाण्याचे वास्तूविशारद श्री. डी. डी. काळे ह्यांनी स्वखर्चाने वास्तू उभी केली. नंतर संस्थेकडून रकमेचा परतावा. १९५९ मध्ये सदर वास्तू (महाराष्ट्र भवन) बांधून तयार. नवीन वास्तूत व्यायामशाळेची सुरुवात. डॉ. पुरंदरे ह्यांची वास्तूसाठी भरीव आर्थिक मदत. सॉलीसिटर पंडित पती-पत्नी ह्यांनी संस्थेच्या वास्तूच्या रस्त्यासाठी स्वतःची गणेश बाग नावाची जागा दिली.
- महाराष्ट्र भवनात संस्थेच्या कार्याला सुरुवात. शिवाय वास्तूत दुकाने सुरु. सार्वजनिक शिक्षण संस्थेने शाळेसाठी संस्थेची जागा भाड्याने घेतली व १९६१ पासून पुरंदरे हायस्कूल संस्थेच्या वास्तूत सुरु झाले. “रोटरी क्लब’ ऑफ मुलुंडच्या सभा सुरु.
- १९६२ साली तत्कालीन कायदेमंत्री मा. हरिभाऊ गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचा रौप्यमहोत्सव साजरा.
- १९६९ साली कै. राम गणेश गडकरी यांची ५० वी पुण्यतिथी जोरात साजरी. आठवडाभर सोहळा संपन्न. तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.
- तत्कालीन अध्यक्ष श्री. सु. ल. गद्रे यांचा पुढाकार. १९७५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन वस्तूचे भूमीपूजन सेवाव्रती वि. स. बापट यांच्या शुभहस्ते संपन्न.
- अनेक लोकांच्या भेटी, देणग्या ह्यातून नवीन वास्तू संपन्न. २३.१०.१९७७ रोजी विजयादशमीला इतिहासज्ञ पद्मश्री श्री. सेतुमाधवराव पगडी यांच्या हस्ते आजच्या वास्तूचे उद्घाटन. युनायटेड वेस्टर्न बँक व अपना बाजार यांचे मोलाचे सहकार्य. वास्तूचे त्या काळातले मूल्य रु. १४ लाख.
- संस्थेच्या गौरवपूर्ण कार्यामुळे सिडकोतर्फे संस्थेला ऐरोली, नवी मुंबई येथे सवलतीच्या दरात भूखंड प्रदान. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. दत्ताजी ताम्हाणे आणि सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष श्री. नारायण मराठे यांच्या उपस्थितीत ऐरोली वास्तूचे भूमीपूजन संपन्न. संस्थेचे विश्वस्त श्री. म. बा. देवधर यांनी दिलेली रु. २५ लाखाची देणगी, अन्य हितचिंतकांनी दिलेल्या देणग्या व युनायटेड वेस्टर्न बँकेने केलेल्या सहकार्यातून सव्वा कोटी रुपयांची वास्तू दोन वर्षात पूर्ण. दि. २६.०३.२००१ ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष श्री. प्र. ना. जोशी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन.
- ऐरोली शाखेत ग्रंथालय, मैत्री विभाग तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरु.
- “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” ह्या संस्थेच्या बोधवाक्याला अनुसरून संस्थेतर्फे सादर होणाऱ्या बहुतेक सर्वच कार्यक्रमांसाठी सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश असतो हे जरूर नमूद करावेसे वाटते.
श्री चंद्रशेखर कुलकर्णी(अध्यक्ष)
श्री जयप्रकाश बर्वे (कार्यवाह)